🍊 *नायट्रोजन* 🥬 जमीनीत जर नायट्रोजन जास्त झाल्यास बोरॉन , कॉपर , पोटॅश हे घटक उचलले जात नाही.. आणि जमीनीत नायट्रोजन वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते. 🍊 *फॉस्फरस* जमीनीत फॉस्फरस वाढल्यास कॉपर , कॅल्शियम , पोटॅश , फेरस , झिंक हे घटक उचलले जात नाही. आणि जमीनीत फॉस्फरस वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते. 🍊 *पोटॅश* जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "बोरॉन , मॅग्नेशियम" हे घटक उचलले जात नाही. आणि जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "मॅंगनीज , फेरस" उचललेली जाते. 🍊 *कॅल्शियम* कॅल्शियम जमीनीत जास्त झाल्यास फॉस्फरस,पोटॅश,मॅग्नेशियम,मॅंगनीज,झिंक,फेरस,बोरॉन,नायट्रोजन हे घटक उचलले जात नाही. चुनखडीयुक्त जमीनीत किंवा मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या जमीनीत अशी स्थिती येउ शकते. 🍊 *मॉलिब्डेनम* मॉलिब्डेनम वाढल्यास कोणतेच घटक कमी होत नाही पण मॉलिब्डेनम वाढल्यास कॉपर व नायट्रोजन वेली कडून जास्त प्रमाणात उचलल्या जातात 🍊 *कॉपर* कॉपर वाढल्यास फेरस व मॅंगनीज जमिनीत असूनही वेलीला घेता येत नाही आणि कॉपर वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा वेलीला उचलण्यास मदत होत नाही 🍊 *मँगनीज* मँगनीज वाढल्यास जमिनीत फेरस असूनही वेलीला घेता येत नाही आणि मॅंगनीज वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा वेलीला उचलण्यास मदत होत नाही 🍊 *फेरस* फेरस वाढल्यास फॉस्फरस आणि झिंक जमिनीत असूनही वेलीला घेता येत नाही आणि फेरस वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा उचलण्यास मदत होत नाही 🍊 *झिंक* झिंक वाढल्यास फेरस जमिनीत असूनही उचलल्या जात नाही आणि झिंक वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा उचलण्यास मदत होत नाही 🍊 *बोरॉन* बोरॉन वाढल्यास कोणत्याच घटकावर परिणाम होत नाही किंवा कोणताही घटक जास्तीचा उचलल्या जात नाही आणि बोरॉन वाढल्यास कॅल्शियम जमिनीमधून उचलले जाते 🍊 *मॅग्नेशियम* मॅग्नेशियम वाढल्यास जमिनीत पोटॅश असून देखील वेलीला घेता येत नाही. आणि मॅग्नेशियम वाढल्यास फॉस्फरस जमिनीतून उचलले जाते. वरील प्रमाणे असे लक्षात आले असेल की, नत्र, स्फुरद आणि पालाश हे कमी किंवा जास्त होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. 🙏👏💐
top of page
![](https://static.wixstatic.com/media/75be96_e9108e608f0b40b6b036e0d45d191812~mv2.jpg/v1/fill/w_1024,h_1024,al_c,q_85,enc_avif,quality_auto/75be96_e9108e608f0b40b6b036e0d45d191812~mv2.jpg)
bottom of page
Comments