top of page

खतांची ओळख व कार्य -



🎯बऱ्याच शेतकरी मित्रांना खते कशी ओळखायची तसेच पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार कोणती खते द्यावीत यासाठीच उपयुक्त माहिती.


🎋*NPK:- नत्र-स्फुरद-पालाश*


🎋*19:19:19:-पिकाच्या प्राथमिक अवस्थेतील जोमदार वाढीसाठी*


🎋*12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी*


🎋*18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी*


🎋*12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी*


🎋*10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी*


🎋*00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी*


🎋*00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.*


*विद्राव्य खतांचे कार्य...*


🎋 *१९:१९:१९, २०:२०:२०*


या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._


🎋 *१२:६१:०*


या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._


🎋 *०:५२:३४*


या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. *_फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._*


🎋 *१३:०:४५*


या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._


🎋*०:०:५०:१८*


या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._


🎋 *१३:४०:१३*


पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.


🎋*कॅल्शियम नायट्रेट -​*


मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.


🎋 *​२४:२४:०*


यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

 
 
 

Recent Posts

See All

1 Comment


Krushi Mitra
Krushi Mitra
Sep 28, 2022

Nice


Like
PicsArt_11-02-09.08.25.png
Get social with us!
  • Facebook
  • Instagram
  • YouTube
Share your thoughts!

 

​Telephone : ​7507032365

Email : krishimitrafoundation@gmail.com

​​​

Office : CEO, Krishi Mitra Foundation 

            Kannad, Aurangabad 431103

Copyright © 2014 - 2025 by Krishi Mitra Foundatiom, Reg.ID. KMF140701. Proudly created by Dnyaneshwar Pawar.

bottom of page