भुईमूग या पिकामध्ये जर आपण सल्फरचा वापर केला तर तीस टक्क्यांनी उत्पादन वाढते.
भुईमूग या पिकांमध्ये फुले येण्याच्या अवस्थेत जर सल्फर या अन्नद्रव्यांची पूर्तता केली तर भुईमुगातील शेंगांची संख्या वाढते व उत्पादनात वाढ होते. सल्फर या खतामुळे पिकातील शेंगा लागणाऱ्या कोंबांची संख्या वाढते. हवेतील नत्र म्हणजेच नायट्रोजन जमिनीमध्ये टाकण्याचे काम खूप चांगल्या प्रमाणात कोणते. झाडांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून क्लोरोफिल तयार होण्यास मदत होते वयामुळे झाड अन्नद्रव्य तयार करून फळांची संख्या वाढते व यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. सल्फर हे झाडांमध्ये प्रथिने, विटामिन्स व एंझाईम तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
भुईमूग या पिकामध्ये आपण सल्फर हे ड्रिंचिंग पद्धतीने देऊ शकतो. सल्फरची मात्र ही खूप कमी प्रमाणात पिकाला लागते त्यामुळे खर्चही जास्त होत नाही. साधारणतः आपण एकरी तीन ते चार किलो सल्फर दिले तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल. 90 टक्के सल्फर असणारी खते बाजारात उपलब्ध आहेत. सल्फर खरेदीसाठी दहा किलो व या पेक्षा जास्त मोठी बॅग बाजारात उपलब्ध आहे.
#crops#agri#agriculture#cropgrowth#krishimitrafoundation#krishimitra#krushi#shetakari#baliraja#ksk#kvk#bscagri#agricoss #groundnut #भुईमूग #शेंगा #सल्फर #Sulpher #michronutrient #fertilizer #nutrients
आपल्याला आणखी याबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा काही शंका असतील तर कृषी मित्र फाउंडेशन ला नक्कीच संपर्क करा. आम्ही आपली नक्कीच मदत करू. या व्यतिरिक्त आपण शासनाच्या कृषी विभागाशी टोल फ्री क्रमांकावर १८००१८०१५५१ संपर्क करू शकता.
Comments