एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये किडींच्या आर्थिक नुकसान पातळीला फार महत्व आहे. त्यासाठी किडींचे सर्वेक्षण करणे महत्त्वाचे असते. एकात्मिक कीड व्यवस्थापन मध्ये खोल नांगरणी, कोळपणी, स्वच्छता मोहीम, योग्य वेळी पेरणी करणे, पिकांची फेरपालट, कुजलेले शेणखत वापरणे, कीडमुक्त बियाण्यांचा वापर करणे, बीजप्रक्रिया. इत्यादी बाबींचा तसेच निंबोळी अर्क सारख्या वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर करणे, कीड नियंत्रणासाठी जैविक घटकांचा परोपजीवी, परभक्षक, जिवाणू, विषाणू, फेरोमन सापळे इत्यादींचा एकत्रित वापर करून कीड आटोक्यात आणावी व गरज पडल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर सर्व शेतकऱ्यांनी सर्वात पिकावर करणे गरजेचे आहे. त्यामुळे
१. किडीपासून होणारे नुकसान टाळता येते.
२. उत्पादनात मोठी भर पडते
३. रासायनिक कीटकनाशकांचा अवाढव्य खर्च वाचतो.
४. शरीर निरोगी राहते.
५. वातावरणाचा समतोल राखला जातो.
६. निर्यातीत वाढ होऊन परकीय चलन मिळण्यासाठी खूप मदत होते.
हे तंत्रज्ञान भविष्यातील सुरक्षित शेतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे खूप गरजेचे आहे. आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांना याबद्दल सांगून जनजागृती केली तर हे नक्कीच फायद्याचे ठरेल.
Nice post...